पब्लिसिटीसाठी 'बलात्कार'?, वाचा मॉडेल आणि वकिलाचं संभाषण

आयपीएस सुनील पारसकर आणि मॉडेल बलात्कार प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होतायत. आधी इमेल, नंतर एसएमएस, वॉट्सअप मेसेज आणि सीसीटीव्हीही फुटेजही बाहेर आलंय... हे बलात्काराचं प्रकरण आहे की, रियालिटी शोसाठी चाललेला निव्वळ पब्लिसिटी स्टंट ? असा प्रश्न त्यामुळं निर्माण झालाय.

Updated: Aug 5, 2014, 09:34 PM IST
पब्लिसिटीसाठी 'बलात्कार'?, वाचा मॉडेल आणि वकिलाचं संभाषण title=

मुंबई : आयपीएस सुनील पारसकर आणि मॉडेल बलात्कार प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होतायत. आधी इमेल, नंतर एसएमएस, वॉट्सअप मेसेज आणि सीसीटीव्हीही फुटेजही बाहेर आलंय... हे बलात्काराचं प्रकरण आहे की, रियालिटी शोसाठी चाललेला निव्वळ पब्लिसिटी स्टंट ? असा प्रश्न त्यामुळं निर्माण झालाय.

आयपीएस अधिकारी सुनील पारसकर, बलात्काराचा आरोप करणारी एक मॉडेल, तिची प्रतिस्पर्धी पूनम पांडे आणि आता वकील रिझवान सिद्दीकी.

या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होतायत. संबंधित मॉडेल आणि तिचे पूर्वीचे वकिल रिझवान सिद्दीकी यांच्यातील सीसीटीव्ही फुटेजच झी मीडियाच्या हाती लागलंय. पब्लिसिटीसाठी पारसकरांना कसं फसवता येईल, याचा प्लानच त्यातून स्पष्ट होतंय, आणि हा सगळा खटाटोप सुरूय तो एका रियालिटी शोमध्ये सहभागी होण्यासाठी.
 
तक्रारदार मॉडेल आणि वकील रिझवान सिद्दीकीमधील संभाषण

मॉडेल - तुम सोचो के हम किसी को कैसे फंसा सकते है, मुवीमें कैसा होता है वैसेवाला प्लॉट...
 
रिझवान सिद्दीकी - तुमको हिलाना है ना ?
 
मॉडेल - सी, तुम ढुंढो...
 
रिझवान सिद्दीकी - ढुंढो क्यू ? मै ढुंढता हूँ मेरे हिसाब से...
 
मॉडेल - बिकॉझ आय रिअली वॉन्ट टू हॅरॅस हिम
 
रिझवान सिद्दीकी - वो मेरे पे छोड दो
 
मॉडेल - नॉट हॅरॅसमेंट, मुझे उसकी बॅड पब्लिसिटी करानी है, दॅट्स इट, ऑल आय वॉन्ट. मुझे उसको परेशान नही करना है. इट्स लाइक 2-3 दिन उसे न्यूजमें जाने दो, दॅट्स ऑल. उसकी इमेज खराब करनी है और कुछ नही
 
रिझवान सिद्दीकी - ह्युमन राइट्स कमिशन के पास केस डालना है क्या ?
 
मॉडेल - हां, सब जगह डाल दो
 
रिझवान सिद्दीकी - नही, वहाँ जाके आरग्यू करना पडेगा
 
मॉडेल - आरग्यू करना पडता है ? कहाँ पे ?
 
रिझवान सिद्दीकी - ह्युमन राइट्स कमिशन, स्टेट ह्युमन राइट्स कमिशन में
 
मॉडेल - अभी जो नोटीस दे रहे है
 
रिझवान सिद्दीकी - वो उसके कपडे उतारने के लिए और तुम्हारी पब्लिसिटी के लिए...

 
बिग बॉस या रियालिटी शोमध्ये पूनम पांडेला एन्ट्री मिळू नये, यासाठीच त्या मॉडेलनं हा सगळा बनाव केल्याचा आरोप तिच्या वकिलांनी केलाय...
 
रिझवान सिद्दीकी आणि मॉडेलमध्ये 23 जून ते 21 जुलैपर्यंत एसएमएस आणि व्हॉटसपवर बोलणं सुरु होतं. हे सर्व पुरावे रिझवाननी पोलिसांना दिलेत. झी मीडियाच्या हाती हे एसएमएस आणि व्हॉट्सअपच्या मॅसेज लागलेत.
 
SMS, WHATSAPP मॅसेज 'झी मीडिया'च्या हाती
 
23 जून -
मला असं माहित पडलंय की, आयपीएस सुनील पारसकर यांनी पूनम पांडेचं अफेयर सुरुय. माझ्या वतीनं तू पारसकरला एक नोटीस पाठव. त्याची एक कॉपी आपण पोलीस कमिशनरला देऊ. त्यावेळी मीडिया पोलीस कमिशनरच्या ऑफिसबाहेर पाहिजे आणि ती कॉपी मीडियाला पण दिली पाहिजे.
 
24 जून - 
सुनील पारसकर आणि माझ्यात झालेल्या इमेल संभाषणाची प्रिंट मी राकेश मारिया यांना देणार आहे. राकेश मारिया पूनम पांडेची चौकशी सुरु करतील. तो पर्यंत तू सुनील पारसकरला नोटीस पाठव.
 
28 जून - 
मी पारसकरला काही मेल पाठवलेत. आता त्याचे माझ्याकडे 20 मेल आहेत. याचा तू पारसकरच्या विरोधात चांगला वापर करु शकतो.
 
28 जून - 
पारसकर शांत बसेल आणि त्या पूनम पांडेला वकील देऊन तिला माझ्या विरोधात मानहानीचा दावा करायला सांगेल.
 
2 जुलै -
मीडियाशी माझं बोलणं झालंय. मी मीडियाला एक छोटी मुलाखत देईन. इंग्लिश आणि अनेक चॅनल्सच्या वरिष्ठांशी माझं बोलणं झालंय. त्यासाठी एक भक्कम नोटीस बनवली पाहिजे. आपण कधी पोलीस कमिशनरची वेळ घ्यायची?
 
4 जुलै -
मी पूनम पांडे आणि पारसकर याविषयी एक ट्विट केलंय. त्यावर एका न्यूज चॅनलच्या हेडनं मला लोकल पोलीस ठाण्यात एफआयआर करायला सांगितली आहे. कशी तक्रार करता येईल?
 
10 जुलै -
सुनील पारसकर आता काही रिप्लाय देत नाहीये. तो सुट्टीवर जाईल बहुतेक. बिग बॉसची कास्टिंग सुरु झालीये. एक तर मी जाईन किंवा ती.. आमच्या दोघींचंही सिलेक्शन नाही होऊ शकतं... कारण आम्ही दोघी एकाच कॅटगरीतील आहोत. गेल्या दोन वर्षापासून आम्ही दोघी लास्ट मिनिटला ड्रॉप होतो. या वर्षी काय होईल ?????
 
15 जुलै -
पारसकरच्या विरोधात आपण कायदेशीर काहीही करु शकत नाही. समज जर पूनम पांडे आणि पारसकर यांच्यातील अफेअरबाबत माझे आणि पारसकरमध्ये झालेले ईमेल लीक केले, तर तो माझ्या विरोधात काही कारवाई करु शकतो का....?
 
त्या मॉडलनं 21 जुलैला रिझवानला शेवटचा मेसेज पाठवला. त्यात तिनं बलात्काराचा उल्लेख केला. तेव्हा रिझवान या प्रकरणापासून वेगळे झाले. आणि काहीच दिवसात मॉडेलनं सुनील पारसकर यांच्या विरोधात एफआयआर दाखल केली. या सर्व खुलाशांमुळे तपास करणारे पोलीसही चक्रावून गेलेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.