चकमक फेम रवींद्र आंग्रे यांचा भाजप प्रवेश

ठाण्यातले चकमक फेम पोलीस अधिकारी रवींद्र आंग्रे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय.

Updated: Feb 2, 2015, 03:49 PM IST
चकमक फेम रवींद्र आंग्रे यांचा भाजप प्रवेश title=

मुंबई : ठाण्यातले चकमक फेम पोलीस अधिकारी रवींद्र आंग्रे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय.

भाजप प्रदेध्याक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत आंग्रे यांनी भाजमध्ये प्रवेश केलाय. 'पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत ठाण्यातून गुंडांची सफाई केली. आता राजकारणातल्या गुंडगिरीची सफाई करणार' अशी प्रतिक्रिया यावेळी रवींद्र आंग्रेंनी दिलीय.

ठाणे महापालिकेत प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला आहे. आगामी काळात या भ्रष्टाचाराला आळा घालणार असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलंय. उल्लेखनीय म्हणजे, आंग्रे यांच्या नावावर अद्याप 54 एन्काऊंटर आहेत.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग यांनी लोकसभा निवडणुकांच्या आधी आयुक्तपदाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. सिंग हे आता भाजपचे खासदारही आहेत. त्यांच्यानंतर आंग्रे हे भाजपवासी होणारे महाराष्ट्रातील दुसरे माजी पोलीस अधिकारी आहेत. 

विधानसभा निवडणूकीदरम्यान रवींद्र आंग्रे यांना ‘रिपाइं’नं  पाठिंबा जाहीर केला होता. 'रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया' पुरस्कृत उमेदवार म्हणून रवींद्र आंग्रे यांनी विक्रोळीमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.