मुंबई : भाजप-सेना यांच्यात सध्या शितयुद्ध सुरु असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज यावर मौन सोडलंय. सरकारनं दिलेल्या घोषणा पूर्ण करण्याची जबाबदारी आपली असल्याचं ते यावेळी म्हणालेत.
शिवाय महानगर पालिकेतील कामांबाबत लोकप्रतिनिधींनाही विश्वासात घेतलं पाहिजे असं म्हणत त्यांनी भाजपचे कान टोचलेत. कर्जत-खालापूरचे शेकाप नेते महेंद्रशेठ थोरवे यांनी आपल्या समर्थकांसह सेनेत प्रवेश केला त्यावेळी ते बोलत होते. थोरवे यांनी २०१४ मध्ये विधानसभा निवडणूक लढवली होती. थोड्या मतांनी त्यांचा राष्ट्रवादीचे आमदार सुरेश लाड यांनी पराभव केला होता.
दरम्यान, 'सामना' मधील अग्रलेखावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सेनेला फटकारलंय. त्याबाबत प्रश्न विचारल्यावर 'मी योग्य वेळी बोलेन' अशी सावध भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतलीय.
मुख्यमंत्री व अर्थमंत्री विदर्भातील असतानाही शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र थांबलेले नाही... याबद्दल सामनाच्या संपादकीयमध्ये टीका करण्यात आली होती. यावर, 'कोणी काही लिहीले, म्हणजे अणुबाँब फुटलेला नाही' असा फटका मुख्यमंत्र्यांनी सेनेला लगावला होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.