मुंबई : दिवाकर रावते यांनी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी एकनाथ खडसे यांना हिरवी टोपी भेट दिली आहे. खडसेंनी ऊर्दू शिकवणाऱया शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय घेतला, असा आरोप करत त्यांना हिरव्या रंगाची टोपी दिवाकर रावते यांनी भेट दिली.
मराठी शाळांमध्ये ऊर्दू शिकवण्याच्या महसूल मंत्री एकनाथ खडसेंच्या निर्णयाचा शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी टीका केली.
प्रत्यक्षात खडसे यांचा शिक्षण विभागाशी संबंधही नाही. मात्र तरीही त्यांनी हा निर्णय घेतला. मराठी शाळांमध्ये ऊर्दू भाषा शिकवणाऱया शिक्षकाची भरती करण्याची मागणी कोणीही केली नव्हती असं रावते यांनी यावेळी सांगितलं.
मराठी शाळांमध्ये एक जरी मुस्लिम विद्यार्थी शिकत असेल, तर तिथे ऊर्दू शिक्षक नेमावा लागेल, त्याच्या नमाजाची व्यवस्था करावी लागेल, असा विचित्र निर्णय खडसेंनी घेतला. म्हणूनच त्यांच्यासाठी आपण हिरव्या रंगाची मुस्लिम टोपी आणल्याचं शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.