मुंबई : दसऱ्याच्या निमित्तानं भगवानगडावर झालेल्या वादानंतर आणि शक्तीप्रदर्शनानंतर पंकजा मुंडे पहिल्यांदाच 'झी २४ तास'च्या माध्यमातून आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी 'झी २४ तास'चे संपादक उदय निरगुडकर यांच्याशी बोलताना त्यांनी आपल्या मनातील अनेक भावना व्यक्त केल्यात.
- पक्षात मी एकाकी नाही... मित्रपक्षांशी माझे संबंध इतरांपेक्षा जास्त प्रेमाचे
- माझी कुणावरही दहशत नाही
- लोकांच्या सुरक्षेसाठी गडाखाली यावं लागलं
- गादीच्या आदरामुळे मी शास्त्रींबद्दल बोलणार नाही
- छगन भुजबळांची भेट अचानक घेतली
- तुरुंगातल्या कैद्याला नाही तर हॉस्पीटलमधल्या आजारी व्यक्तीला भेटले
- त्यांच्या तब्येतीविषयी काळजी वाटल्यानं त्यांची भेट घेतली
- मी काही केलं तरी त्याच्यावर टीका होते
- देवेंद्र फडणवीस आणि माझे संबंध आणखीन दृढ झालेत
- जलसंधारण खातं काढल्याचं खंत नाही
- ट्विटमुळे वाद झाला हे दुर्दैवी
- मुख्यमंत्री ग्रामविकास योजनेतून माझं काम दोन दिवसांत दिसेल
- नियोजित दौऱ्यामुळे कुपोषणासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीला गैरहजर
- माझ्या खात्यात मुख्यमंत्र्यांची ढवळाढवळ नाही
- सगळ्याच गोष्टींसाठी संघर्ष करावा लागतो
- मेटे, जानकर, खोत यांच्याशी पंकजा मुंडे नाही प्रदेशाध्यक्ष संपर्कात असतात
- मला लढायचं आहे... लढून जिंकणार
- अॅट्रॉसिटी एखाद दोन ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं वापरली गेली म्हणून रद्द करणं चुकीचं
- अनेक ठिकाणी दलित समाजावरचे अन्याय, असुरक्षितता अजिबात कमी झालेली नाही
- जातींमध्ये अडकणं समाजघातकी ठरेल
- अॅट्रॉसिटीचा कायदा दलितांसाठी चिलखत
- माझ्या अण्णांचं पार्थिव पाहून मी गहिवरले
- रक्ताच्या नात्यामुळे मी भावूक झाले
- पण, म्हणून निवडणूकीत ते माझा आणि मी त्यांचा प्रचार करताना दिसणार नाही
- प्रीतम मुंडे आपल्या आवडीच्या क्षेत्रात
- प्रीतम मुंडे काही बाबतींत प्रीतम माझा सल्ला घेतात
- मोठी बहिण आणि पालकमंत्री म्हणून ती माझं मार्गदर्शन घेते