मुंबई : पुण्याच्या शिक्षण प्रसारक मंडळीला आणखी एक दणका बसलाय. संस्थेच्या मुंबईतल्या रुईया महाविद्यालायामध्येही अतिरिक्त शुल्क घेत असल्याचा उच्च शिक्षण विभागानं आपल्या अहवालात म्हटलंय.
शिक्षण प्रसारक मंडळीवर प्रशासक नेमण्यासाठी सहसंचालकांनी पत्र दिलंय. यात संस्थेचा खुलासा समाधानकारक नाही तसंच विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्क घेण्यात आल्याचं म्हटलंय. हा अहवाल संचालकांकडे सादर करण्यात आलाय.
यापूर्वी शालेय शिक्षण विभागानंही चौकशी अहवालात नियमबाह्य शुल्क आकारल्याचं स्पष्ट केलं होतं. शिक्षण मंत्री रुईया कॉलेज आणि शिक्षण प्रसारक मंडळीवर काय कारवाई करणार, हे पाहणं महत्त्वाचं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.