'सामना'तील कार्टूनप्रकरणी उद्धव ठाकरे यांची जाहीर माफी

'सामना'तील कार्टूनप्रकरणी संपादक आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर माफी मागितली आहे. कोणाच्या भावना दुखविण्याचा हेतू नव्हता. कोणाच्या जर भावना दुखवल्या असतील त्यांची बाळासाहेबांचा पूत्र म्हणून मी माफी मागतो, असे उद्धव म्हणालेत.

Updated: Oct 1, 2016, 02:50 PM IST
'सामना'तील कार्टूनप्रकरणी उद्धव ठाकरे यांची जाहीर माफी title=

मुंबई : 'सामना'तील कार्टूनप्रकरणी संपादक आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर माफी मागितली आहे. कोणाच्या भावना दुखविण्याचा हेतू नव्हता. कोणाच्या जर भावना दुखवल्या असतील त्यांची बाळासाहेबांचा पूत्र म्हणून मी माफी मागतो, असे उद्धव म्हणालेत.

राज्यात मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाचे भव्या मोर्चे निघत आहेत. 'मराठा क्रांती मूक मोर्चा' या नावाने हे मोर्चे निघत आहेत. या मराठा समाजाच्या क्रांती मूक मोर्चाबद्दल एक व्यंग्यचित्र रेखाटण्यात आले होते. या व्यंग्यचित्रावरून मराठा समाजाच्या भावना दुखविल्याने नवा वाद निर्माण झाला. 

मात्र, कोणताही वाद करण्याचा प्रयत्न नव्हता. मात्र दिलगिरी करुन सुद्धा पुन्हा वाद करण्यात आला. यावर राजकारण केले गेले. त्यामुळे मला खूप दुख: झालं. मात्र ते केवळ एक व्यंगचित्र होते, त्याद्वारे कोणालाही दुखावण्याचा किंवा अपमान करण्याचा आमचा हेतू नव्हता, असे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले. 

माता- भगिनींचा अपमान करण्याचाही हेतू नव्हता,  महिलेचा अपमान करणारा शिवसैनिक असूच शकत नाही. मात्र तरीही कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास मी शिवसेना आणि ' सामना'चा प्रमुख म्हणून माफी मागतो, असे उद्धव म्हणाले. मुंबईतील पत्रकार परिषदेत त्यांनी माफी मागितली.