'सामना'तून मोदींचं कौतुक आणि शालजोडीतले वारही!

मोदींच्या अमेरिकन संसदेतल्या भाषणाची स्तुती करणाऱ्यांच्या यादीत आज शिवसेनेचंही नाव जोडलं गेलंय.

Updated: Jun 10, 2016, 01:23 PM IST
'सामना'तून मोदींचं कौतुक आणि शालजोडीतले वारही! title=

मुंबई : मोदींच्या अमेरिकन संसदेतल्या भाषणाची स्तुती करणाऱ्यांच्या यादीत आज शिवसेनेचंही नाव जोडलं गेलंय.

आजच्या 'सामना'मधून मोदींनी अमेरिकेन संसदेच्या संयुक्त अधिवेशनात केलेल्या भाषणाचं कौतुक करतानाच अगदी शालजो़डीतले प्रहारही केलेत.

'जोरदार मोदी'

'जोरदार मोदी' या मथळ्याखाली सामनाच्या संपादकियातून मोदींवर स्तुतीसुमनांचा वर्षाव करण्यात आलाय. पण त्याचबरोबर मोदी-ओबामाच्या मैत्रीवर टोलाही हाणण्यात आलाय.

दाम्पत्य रियाटर्ड झाल्यावर सुरत, पोरबंदर, महाबळेश्वर किंवा दिल्लीत स्थायिक होणार आहे की काय? असा चिमटा काढण्यात आलाय.  

अमेरिकन संसदेत मोदींच्या भाषणाला मिळालेला प्रतिसाद म्हणजे त्यांच्या लोकप्रियतेची पावती असल्याचंही सामनानं म्हटलंय.

मोदींनी अमेरिकन काँग्रेसमध्ये केलेल्या भाषणामुळे इथल्या काँग्रेसनं तांडव करण्याची गरज नाही, अशी कोपरखळीही लगावण्यात आलीय.