रिकाम्या हातानं खडसे मुंबईत परतले

दिल्लीला वरिष्ठ नेत्यांच्या भेटीच्या आशेने एकनाथ खडसे आज सकाळीच मुंबईला परतलेत. 

Updated: Jun 10, 2016, 12:37 PM IST
रिकाम्या हातानं खडसे मुंबईत परतले title=

मुंबई : दिल्लीला वरिष्ठ नेत्यांच्या भेटीच्या आशेने एकनाथ खडसे आज सकाळीच मुंबईला परतलेत. 

काल रात्री त्यांनी नितीन गडकरींची भेट घेतली खरी... पण पक्षातल्या इतर बड्या नेत्यांच्या भेटीसाठी थांबणं व्यर्थ असल्याचं लक्षात आल्यावर नाथाभाऊ मुंबईकडे रवाना झाले. 

दरम्यान, एकनाथ खडसेंच्या चौकशीवरुन विरोधक पुन्हा आक्रमक झालेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी मुख्यमंत्र्यांना विचारणा केलीय. कोणत्या निवृत्त न्यायाधिशांमार्फत चौकशी करणार? चौकशीच्या अटी आणि शर्थी काय असतील? अशी विचारणा तटकरेंनी केलीय.