पुणे : पुण्याच्या येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या संजय दत्तची टर उडवली जात असल्याचं सांगण्यात येतंय.
या अडचणीबाबत संजय दत्तने दिग्दर्शक राजकुमार हिरानीकडे पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
हिरानी यांच्या आगामी पीके चित्रपटातही संजय दत्तने विशेष भूमिका पार पाडली आहे.
जेव्हा पीके चित्रपटाचं पोस्टर लॉन्च करण्यात आलं, तेव्हा या पोस्टरवर आमीर खानने अंगावर एक कपडाही ठेवलेला दिसत नाही. यावरून जेलमधील कैद्यांनी संजय दत्तची खेचाखेची सुरू केली आहे.
संजय दत्तने या पत्रात लिहलंय, "लोकांनी माझी थट्टा करायला सुरूवात केली आहे, हे म्हणतायत, हिरानी पुढच्या पोस्टरमध्ये माझ्याही अंगावर कपडे ठेवणार नाहीत"
पीके 19 डिसेंबरला रिलीज होणार आहे, सध्या या चित्रपटाचं पोस्ट प्रॉडक्शनचं काम सुरू आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.