शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे चुकीचे - एसबीआय चेअरमन

देशाची सर्वात मोठी बँक एसबीआयच्या चेअरमन अरूंधती भट्टाचार्य यांनी शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणं चूक असल्याचं म्हटलं आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 15, 2017, 02:42 PM IST
शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे चुकीचे - एसबीआय चेअरमन title=

मुंबई : देशाची सर्वात मोठी बँक एसबीआयच्या चेअरमन अरूंधती भट्टाचार्य यांनी शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणं चूक असल्याचं म्हटलं आहे. पीएएसयू बँकांनाही सरकारी मदतीची अपेक्षा ठेवू नये, असं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला विरोध करताना अरुंधती भट्टाचार्य म्हणाल्या.

अरुंधती भट्टाचार्य यांनी सराकरकडून शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या कर्जमाफीच्या आश्वासनाला विरोध केला आहे.

कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांकडून बँकांचे कर्ज परतफेडीवर चुकीचा परिणाम होतो. कर्जमाफीमुळे शेतकरी पुन्हा निवडणुकीची वाट पाहत राहतील, परतफेड करण्याऐवजी कर्ज माफ होण्याची वाट बघतील, असं अरूंधती भट्टाचार्य यांनी म्हटलं आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनीही शेतकऱ्यांसारखंच सरकारी मदतीची अपेक्षा ठेवू नये, सार्वजनिक क्षेत्रातील बँका जेव्हा डबघाईला येतात, तेव्हा त्या सरकारी मदतीची अपेक्षा करतात, असं अरूंधती भट्टाचार्य यांनी म्हटलं आहे.