www.24taas.com, मुंबई
रविंद्र नाट्य मंदिरात होणाऱ्या सोहळ्यात सेना मनसे एकत्र आलेच नाही. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर आज प्रथमच राज ठाकरे आणि शिवसेनेचे नेते मनोहर जोशी एकाच मंचावर येत होते. परंतु, दुसरा कार्यक्रम असल्याचे सांगून मनोहर जोशी यांनी या कार्यक्रमाला येणे टाळले.
शिवसेनाप्रमुख यांची इच्छा कालच रामदास कदम यांनी व्यक्त केली की, शिवसेना आणि मनसे यांनी एकत्र यावं. गेल्या काही दिवसांपासून सेना आणि मनसेमधील जवळीक सगळ्यांनाच माहित आहे. आजही त्याचा पुढचा अध्याय लिहिला जाणार होता. परंतु, अचानक मनोहर जोशी यांनी दांडी मारून सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या सोहळ्यावर विरजण पाडले आहे.
मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयातर्फे दिल्या जाणाऱ्या शांताबाई शेळके साहित्य पुरस्कारांच्या वितरण सोहळ्याला केवळ राज ठाकरे यांन उपस्थित होते. होणार आहे.
काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन सुमारे दोन तास बाळासाहेबांसोबत घालवले होते. यापूर्वी मनोहर जोशी यांनीही राज आणि उद्धवनं एकत्र येणं गरजेचं असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे मनसे शिवसेना एकत्र येण्याबाबत चर्चेला चांगलच उधाण आलं आहे.