मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आज संसदेमध्ये सादर करणार आहेत. त्यापूर्वीच शेअर बाजाराची सुरुवात आज सकाळी सकारात्मक झाली आहे.
दरम्यान, आजचा दिवस भांडवली बाजारासाठी ऐतिहासीक ठरणार आहे. कारण भांडवली बाजारात शनिवार आणि रविवारी व्यवहार होत नसतात. मात्र आज अर्थमंत्री अरुण जेटली अर्थसंकल्प सादर करणार असल्याने आज भांडवल बाजार सुरु ठेवावे अशी सूचना सेबीने मुंबई, राष्ट्रीय तसेच अन्य शेअर बाजारांना दिलीये. त्यामुळे आज प्रथमच सकाळी ९ ते दुपारी साडेतीन असा पूर्व वेळ शेअर बाजारांमधलं कामकाज होणार आहे.
अनेक आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या या सरकारकडून नोकरदार, उद्योगपती, शेतकरी, बेरोजगार यांच्याबरोबर अनेकांच्या असलेल्या अपेक्षांचे मोठे ओझे जेटलींवर असणार आहे.
दरम्यान, सध्या मुंबई शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्स २९ हजार ४११ अंशांवर व्यवहार करत असून त्यात १९१.२१ अंशांची वाढ झाली आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजार (निफ्टी) निर्देशांकात देखील वाढ झाली आहे. निफ्टी सध्या ८ हजार ८९६ पातळीवर व्यवहार करत असून त्यात ५२.२० अंशांची वाढ झाली आहे.
मुंबई शेअर बाजारात बॅंक ऑफ बडोदा, स्टेट बॅंक ऑफ इंडिया आणि जिन्दल स्टील यांचे शेअर्स तेजीत आहेत तर मारुती, आणि आयटीसी यांचे शेअर्स आज गडगलेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.