मुंबई : तुम्ही आपली वस्तू एखाद्या ठिकाणी विसरले तर ती परत केली जाईल, याची शाश्वती फार कमी असते. मात्र एका टॅक्सी ड्रायव्हरने प्रामाणिकपणा दाखवून एका प्रवाशाची पर्स परत केली आहे.
यासाठी टॅक्सी ड्रायव्हरने स्वत:चे २० ते २५ रूपये देखील खर्च केले, टॅक्सी चालवून पोट भरणाऱ्या, ७५ वर्षीय टॅक्सी चालकाचं हे कार्य तरूणांसाठी प्रेरणादायी आहे. तहसीलदार हे 1962 पासून मुंबईच्या रस्त्यांवर टॅक्सी चालवतात.
एका परिचारिकेची बॅग ती टॅक्सीत विसरुन होती, महाराष्ट्र नर्सिंग फेडरेशनच्या कार्यक्रमाला आली होती, परिचारिका मरिन लाईन येथे बिर्ला मातूश्री सभागृहात कार्यक्रमाला आली. तेव्हा तिला तिच्या बॅगेचा विसर पडला.
मात्र तिला सोडून जाणाऱ्या टॅक्सीवाल्याला त्याच्या टॅक्सीच्या टपावर बॅग असल्याचे सांगितले, तेव्हा त्याने तिला टॅक्सी देण्यासाठी गाडी वळवली. त्यासाठी त्यांने स्वतःचं 20 ते 25 रुपयांचं नुकसानही केलं.
सभागृहाच्या बाहेर तहसिलदार सिंग आले, त्यांनी सभागृहाच्या पहाऱ्यावर असलेल्या पोलिसांना ही माहिती दिली. त्यानंतर पोलिसांच्या सांगण्यावरुन सभागृहात ही माहिती जाहीर करण्यात आली.
विक्रोळी पार्कसाईट येथे राहणाऱ्या तहसिलदार यांनी आजवर अनेकांचे मोबाईल आणि बॅग परत केल्याचे त्यांनी सांगितले. मोबाईल किंवा वस्तू हरवली तर ते युनियनच्या कार्यालयात जमा करतो, असं त्यांचं म्हणणं आहे.