लोकसभा निवडणुकीत राज्यात वेगळं चित्र दिसेल, पवारांना विश्वास

आगामी निवडणुकांमध्ये वेगळं चित्र दिसेल, असं राष्ट्रवादीचे सर्वसर्वा शरद पवार यांनी म्हटलं आहे. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत नेहमीच वेगळे आणि धक्कादायक निकाल येतात. मात्र याचा आपण धसका घेण्याचं कारण नसल्याचंही यावेळी शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे.

Updated: Jan 5, 2014, 03:20 PM IST

www.24taas.com, दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई
आगामी निवडणुकांमध्ये वेगळं चित्र दिसेल, असं राष्ट्रवादीचे सर्वसर्वा शरद पवार यांनी म्हटलं आहे.
दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत नेहमीच वेगळे आणि धक्कादायक निकाल येतात. मात्र याचा आपण धसका घेण्याचं कारण नसल्याचंही यावेळी शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे.
मुंबईत राष्ट्रवादीची लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांची कार्यशाळा सुरू आहे, या कार्यशाळेच्या निमित्ताने शरद पवार बोलत होते.
शरद पवार यांनी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं यावेळीही स्पष्ट केलं आहे. मात्र मार्चमध्ये आपण राज्यसभेची निवडणूक लढवणार असल्याचंही यावेळी शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे.
मी आता राजकीय प्रवासात कुठेतरी थांबायचा निर्णय घेतला आहे, यामुळे पक्षासाठी अधिक वेळ देण्यास अधिक वेळ मिळणार आहे. यामुळे ज्येष्ठांचं सभागृह म्हणजे राज्यसभेत जाण्यास काहीही हरकत नाही, असं यावेळी पवारांनी म्हटलं आहे.
सोशल मीडिया आत्मसाथ करण्याची गरज
सोशल मीडिया आत्मसाथ करण्याची गरज असल्याचं मत यावेळी पवारांनी बोलून दाखवलं, सोशल मीडिया फेसबुक, ट्विटरसारख्या माध्यमांवर काम करण्याची आणि लक्षकेंद्रीत करण्याची गरज असल्याचं यावेळी पवारांनी सांगितलं.
राज्यात २६ जानेवारीपासून अन्नसुरक्षा कायदा लागू करण्यात येणार आहे. राष्ट्रवादीने या बैठकीत मागील लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांनाही बोलवलं आहे. आज पहिल्या दहा मतदार संघांवर चर्चा होणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.