मुंबई : शीना बोरा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी हिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला जे. जे. हॉस्पीटलमध्ये अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलेय. इंद्राणीने तणावाच्या गोळ्या जास्त खल्ल्याने तिची प्रकृती खालावली.
इंद्राणीला दुपारी २ वाजण्याच्या दरम्यान जे. जे.मध्ये दाखल करण्यात आले. त्यावेळी इंद्राणी बेशुद्ध अवस्थेत होती. इंद्राणीला २४ तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे, अशी माहिती जे.जे. हॉस्पीटलचे अधिष्ठाता तात्याराव लहाने यांनी एएनआयला दिली. ती उपचारांना कशाप्रकारे प्रतिसाद देते, हे तपासण्यात येणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, इंद्राणीने तणावाच्या गोळ्या सेवन केल्या आहेत की नाही, याबाबत वैद्यकीय रिपोर्ट आल्यानंतर स्पष्ट होईल, असे रुग्णालयाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
We think that she (Indrani Mukherjea) has consumed some tablets, we are treating her on that basis: TP Lahane pic.twitter.com/N0yjBvSCGK
— ANI (@ANI_news) October 2, 2015
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.