व्हिडिओ : शिवसेनेचं ग्रामविकासाचं 'शिवधनुष्य' प्रदर्शित

विधानसभा निवडणूक 2014 च्या तोंडावर सेनेच्या व्हिजन डॉक्युमेंटचा पुढचा टप्पा सादर करण्यात आलाय. 

Updated: Sep 26, 2014, 05:18 PM IST
व्हिडिओ : शिवसेनेचं ग्रामविकासाचं 'शिवधनुष्य' प्रदर्शित title=

मुंबई : विधानसभा निवडणूक 2014 च्या तोंडावर सेनेच्या व्हिजन डॉक्युमेंटचा पुढचा टप्पा सादर करण्यात आलाय. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव यांच्या संकल्पनेतून साकार झालेलं विकासाचं 'इंद्रधनुष्य' प्रसिद्ध करण्यात आलंय. 

उपग्रहाच्या माध्यमातून मोठ्या शहरांना छोट्या गावांपर्यंत माहिती केंद्रांद्वारे जोडण्यात येईल... प्रत्येक गावात एक इंद्रधनुष्य केंद्र स्थापन करण्यात येईल... असा दावा याद्वारे करण्यात आलाय. 

आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं ग्रामविकासाचं ध्येय याद्वारे सादर करण्यात आलंय. कृषी, शिक्षण, महिला सबलीकरण, आरोग्य, क्रीडा, माहिती केंद्र, मनोरंजन आणि प्रबोधन यांतून ग्रामीण जीवनाचा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कायापालट करण्याचं स्वप्न या 'इंद्रधनुष्य'मधून शिवसेनेनं जनतेला दाखवलंय.  

व्हिडिओ पाहा - 
 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.