शेतकरी कर्जमाफीवरून शिवसेनेने केली मुख्यमंत्र्यांची कोंडी

कर्जमाफीच्या मुद्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मातोश्रीवर शिवसेना मंत्र्यांची बैठक घेतली. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना भेटून कर्जमुक्तीचा ठोस निर्णय घ्यावा, अशी भूमिका शिवसेनेनं घेतलीय. 

Updated: Mar 15, 2017, 07:29 PM IST
शेतकरी कर्जमाफीवरून शिवसेनेने केली मुख्यमंत्र्यांची कोंडी title=

मुंबई : कर्जमाफीच्या मुद्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मातोश्रीवर शिवसेना मंत्र्यांची बैठक घेतली. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना भेटून कर्जमुक्तीचा ठोस निर्णय घ्यावा, अशी भूमिका शिवसेनेनं घेतलीय. 

विधिमंडळाचे कामकाज चालावे आणि शेतक-यांचा प्रश्न देखील सुटावा, असं शिवसेनेला वाटतंय. उद्धव ठाकरेंचा हा निरोप घेऊन शिवसेनेचे मंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वर्षावर भेटले. उद्या किंवा परवा पंतप्रधानांची वेळ घेऊन त्यांचीही भेट घेतली जाणाराय. 

कर्जमुक्तीबाबत शिवसेना आग्रही असून, मागे फिरण्याचा प्रश्नच नाही, असं परिवहनमंत्री दिवाकर रावतेंनी स्पष्ट केलंय.

रामदास कदम काय म्हणाले...  

कोंडी फुटली अस नाही पण उद्भवजींची भूमिका स्पष्ट. कामकाज झालं पाहिजे आणि शेतकरी कर्ज मुक्ती पण झाली पाहिजे.. 

मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या शिष्ट मंडळा सह तातडीने पंतप्रधानांना भेटावं असं उद्धवजी म्हणालेत

मुख्यमंत्री वेळ घेऊन आज रात्री पर्यंत आम्हांला कळवणार आहेत

पंतप्रधानांची भूमिका सकारात्मक असेल तर कामकाज चालेल

पंतप्रधानांना फक्त भेटणं नाही. सकारात्मक उत्तर मिळावं.  मुख्यमंत्र्यांनी आपलं वजन वापरून कर्ज मुक्ती द्यावी मग कामकाज चालेल

मुख्यमंत्री सकारात्मक आहेत म्हणून त्यांनी सांगितलं मी संपर्क साधतो आणि आजच सांगतो

जिल्हा परिषद युती हा वेगळा विषय त्यावर उद्धवजी निर्णय घेतील

 मुख्यमंत्री आम्हाला आज सकारात्मक दिसले , रात्री पर्यंत कळणार पंतप्रधानांना कधी भेटणार