सेना-भाजपात कुरघोडी, अमित शाहांवर काँग्रेसची बोचरी टीका

भाजप अध्यक्ष अमित शाह मातोश्रीवर पोहोचल्यानं वादावर पडदा पडला असला तरी दोन्ही पक्षांमध्ये अजूनही कुरघोडी सुरू असल्याचंच चित्र दिसलं. तर काँग्रेसने अमित शाह यांच्यावर बोचरी टीका केलेय. 

Updated: Sep 5, 2014, 09:13 AM IST
सेना-भाजपात कुरघोडी, अमित शाहांवर काँग्रेसची बोचरी टीका title=

मुंबई : भाजप अध्यक्ष अमित शाह मातोश्रीवर पोहोचल्यानं वादावर पडदा पडला असला तरी दोन्ही पक्षांमध्ये अजूनही कुरघोडी सुरू असल्याचंच चित्र दिसलं. तर काँग्रेसने अमित शाह यांच्यावर बोचरी टीका केलेय. 

अमित शाह यांच्या स्वागतासाठी भाजपनं बरोब्बर मातोश्रीसमोर कलानगर हायवेला मोठ्ठंच्या मोठ्ठं बॅनर लावलं होतं. त्या बॅनवरच शिवसेनेनं बाळासाहेबांचं पोस्टर आयत्यावेळेला आणून लावलं. भाजपचं भलं मोठं पोस्टर त्यामुळे झाकलं गेलं नाहीच. पण शिवसेनेनं हा आयत्यावेळी केलेल्या खोचकपणामुळं दोन्ही पक्षांमध्ये अजूनही आलबेल नाही, हेच पुन्हा दिसून आलं.
 
तर दुसरीकडे अमित शाहांच्या भाषणावर काँग्रेसनं खोचक टीका केलीये. आदिलशहा, कुतुबशहा आणि आता अमित शाहा महाराष्ट्राला शिवाजींची महती सांगणार का ? असा टोला लगावलाय. कोण आहेत अमित शाहा ? एनकाऊँटर फेम, तडीपार, अशी विश्लेषण लागलेले हेच का ते अमित शाहा ? असा सवालही काँग्रेसनं केलाय. 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीवर हल्लाबोल केलाय. राष्ट्रवादी ही भ्रष्टवादी पार्टी असल्याचा टोला त्यांनी लगावलाय. नारायण राणे आणि अजित पवार यांचाही त्यांनी चांगलाच समाचार घेतलाय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.