शिवसेना-भाजपमधील तिढा सुटला, शिवसेनेला १२ मंत्रिपदे

शिवसेना-भाजपमध्ये सकारात्मक चर्चा सुरु आहे. याबाबतची घोषणा १ वाजता होणाऱ्या संयुक्त पत्रकार परिषदेत होईल, अशी माहिती शिवसेना नेते रामदास कदम यांनी दिली.

Updated: Dec 4, 2014, 09:05 PM IST
शिवसेना-भाजपमधील तिढा सुटला, शिवसेनेला १२ मंत्रिपदे title=

दुपारी १.३२

खातेवाटप रात्रीपर्यंत ठरवू. दोन्ही पक्ष आपआपल्या भूमिकांवर ठाम

दुपारी १.३१

राज्याला समृद्ध करण्यासाठी सरकार प्रयत्न करेल - सुभाष देसाई

दुपारी १.३०

राज्याला स्थिर सरकार देण्यासाठी एकत्र. जनतेच्या आग्रहाप्रमाणे एकत्र सरकार चालवणार - सुभाष देसाई

दुपारी १.२९

महापालिका, जिल्हापरिषद आणि सर्वच ठिकाणी युतीतच राहणार. शिवसेनेचे एकूण १२ मंत्री, ५ कॅबिनेट, ७ राज्यमंत्री 

दुपारी १.२८

आम्ही संध्याकाळी भाजपच्या मंत्र्यांची नावे निश्चित करु - मुख्यमंत्री

दुपारी १.२७

शिवसेनेला आम्ही १२ मंत्री पदे देणार आहोत - मुख्यमंत्री फडणवीस

दुपारी १.२७

आम्ही एकत्रित सरकार चालविण्याचा निर्णय घेतलाय. सरकार आणि युती चालली पाहिजे म्हणून कसं काम करता येईल याबाबत चर्चा - मुख्यमंत्री

दुपारी १.२४

जनतेची इच्छा होती. जनतेचा सन्मान आम्ही राखला. संयुक्त सरकार होण्यासाठी प्रयत्न केले. मी उद्धव ठाकरे यांना फोन केला - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दुपारी १.२३

महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा होती शिवसेना-भाजप असंच सरकार चालावं
जनतेच्या इच्छेचा सन्मान राखला गेला पाहिजे म्हणून एकत्र

दुपारी १.२२

काँग्रेसविरोधात जनतेने कौल दिला आम्हाला - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दुपारी १.२०

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुभाष देसाई, अनिल देसाई, चंद्रकांत पाटील, मिलिंद नार्वेकर, रामदास कदम, पंकजा मुंडे आदी उपस्थित

दुपारी १.१९

भाजप-शिवसेना संयुक्त पत्रकार परिषद सुरु

दुपारी १.१०

शिवसेनेचे कॅबिनेटमंत्री
रामदास कदम, एकनाथ शिंदे,  दीपक सावंत, सुभाष देसाई, दिवाकर रावते 

राज्यमंत्री 
रवींद्र वायकर , दीपक केसरकर,  संजय राठोड, राजेश शिरसागर, विजय शिवतारे

दुपारी १.०५

पाच कॅबिनेट आणि पाच राज्यमंत्री घेणार शपथ

दुपारी १२.५०

रामदास कदम, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, दिवाकर रावते, मिलिंद नार्वेकर पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार

दुपारी १२.४०

सह्याद्रीवर शिवसेना नेते उपस्थित

दुपारी १२.३५

दुपारी १ वाजता भाजप-शिवसेना संयुक्त परिषद

दुपारी १२.३२

शिवसेना-भाजपमधला तिढा सुटला

मुंबई : शिवसेना-भाजपमध्ये सकारात्मक चर्चा सुरु आहे. याबाबतची घोषणा १ वाजता होणाऱ्या संयुक्त पत्रकार परिषदेत होईल, अशी माहिती शिवसेना नेते रामदास कदम यांनी दिली.

शिवसेना-भाजपमधला पेच सुटल्याची चिन्हं आहे.  शिवसेनेच्या मागणीपुढे भाजपचं नमतं घेतलं आहे.  शिवसेनेचे सर्व १२ मंत्री उद्या शपथ घेण्याची शक्यता आहे. घटकपक्षांचाही समावेश अपेक्षित आहे. दरम्यान, शिवसेना-भाजपची संयुक्त पत्रकार परिषद सह्याद्रीवर होणार आहे. १ वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेमध्ये रामदास कदम, अनिल देसाई, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, दिवाकर रावते, मिलिंद नार्वेकर हे  उपस्थित राहणार आहेत.

 शिवसेना-भाजपमधला तिढा सुटला आहे. राज्यातील मंत्रिमंडळात शिवसेनेचा समावेश नक्की झाल्यानंतर आता आमदारांमधून लॉबिंग आणि दबावतंत्राचा वापर सुरू झालेय. वरोऱ्याचे आमदार बाळू धानोरकर यांना मंत्रिमंडळात सहभागी करण्याची मागणी स्थानिक शिवसैनिकांनी केली आहे.

धानोरकर पूर्व विदर्भातले पक्षाचे एकमेव आमदार असल्यामुळे त्यांना मंत्रीपद देण्यात यावं, अशी त्यांच्या समर्थकांची मागणी आहे. माजी कॅबिनेट मंत्री आणि भाजप उमेदवार संजय देवतळे यांचा पराभव करून ते जायंट किलर ठरलेत. केंद्र आणि राज्यात पूर्व विदर्भातले मातब्बर नेते मंत्रिमंडळात असताना शिवसेनेची ताकद वाढण्यासाठी धानोरकरांना मंत्रीपद देण्याची मागणी पुढे आली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.