मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मालमत्तेवरून जो वाद निर्माण झालाय. त्यावर मुंबई उच्च न्यायालयात मृत्यू पत्रावर सुनावणी सुरु आहे.
या सुनावणीत पहिल्या साक्षीदाराची साक्ष घेण्यात आली. वकील एफ डिसूजा यांची साक्ष घेण्यात आली. एफ डिसूजा यांनी बाळासाहेबांच्या मृत्यू पत्रावर स्वाक्षरी केली होती. पुढील सुनावणी १० डिसेंबरला ठेवण्यात आलीये. उद्धव यांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेनुसार बाळासाहेबांनी १३ डिसेंबर २०११ रोजी मृत्यूपत्र केले होते आणि त्याच दिवशी सही केली होती.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मालमत्तेवरून जो वाद निर्माण झालाय. वकील एफ डिसूजा यांची साक्ष घेण्यात आली. एफ डिसूजा यांनी बाळासाहेबांच्या मृत्यू पत्रावर स्वाक्षरी केली होती. एफ डिसूजा यांची जयदेव ठाकरे यांच्या वकीलांनी उलटतपासणी घेतली. यावेळी डीसूजा यांना बाळासाहेबांच्या मृत्यूपत्र कोणी बनवण्यास सांगितले. तुम्हाला कोणी बाळासाहेबांकडे नेलं, मृत्यूपत्र बनवताना कोण कोण होतं, यासह अनेक प्रश्न विचारले.
यावेळी एफ डीसूजा यांना सांगितलेली प्रमाणे १९९७ साली मातोश्रीवर बाळासाहेबांच्या उपस्थित एक बैठक झाली होती. यावेळी बाळासाहेबांसोबत २ ते ३ बैठका झाल्या होत्या. बाळासाहेबांचे जवळचे मित्र रवी दोडी यांना बाळासाहेबांनी इच्छापत्र, मृत्यूपत्राताची गुप्तता राखण्यासाठी एक लो प्रोफाईल वकील बघण्यास सांगितल होतं. त्याकरता रवी दोडी यांना जेरोम सल्लांना आणि फेलनिन डिसूजा यांची निवड केली होती.
१९९७ ते २०११ या काळात बाळासाहेब ठाकरे यांनी ८ ते ९ मृत्यूपत्र तयार करुन घेतले होते. एवढेच नाही तर मृत्यूपत्रातावर सही करण्याआधी बाळासाहेब ठाकरे स्वतः मृत्यूपत्र वाचायचे. दरम्यान गुरुवारी सुनावणी पूर्ण झाली असून, पुढील सुनावणी १० डिसेंबरला ठेवण्यात आली आहे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूपत्राच्या वादाबाबत खटल्यावरील सुनावणी ही इन कॅमेरा घेतली जावी, अशी उद्धव ठाकरे यांची मागणी न्यायालयाने फेटाळली होती. पण न्यायालयाला गरज वाटल्यास न्यायालय योग्य वेळी ते ठरवेल असं ही न्यायालयाने म्हटले होते.
बाळासाहेबांच्या मृत्यूपत्रानुसार त्यांची संपूर्ण संपत्ती ही उद्धव आणि त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली आहे. जयदेव यांच्यासह बिंदूमाधव यांना काहीही देण्यात आले नाही. त्यावर जयदेव यांनी आक्षेप घेतला आहे. बाळासाहेबांच्या मृत्यूपत्रावर त्यांची स्वत:ची सही नाही. अखेरच्या दिवसांत बाळासाहेबांची तब्येत खालावली होती. त्यामुळे मृत्यूपत्रावर सही करणे शक्य नसल्याचा दावा करत मृत्यूपत्रात संपत्तीबाबतच्या अनेक गोष्टींचा समावेश नाही, असा आक्षेपही जयदेव यांनी घेतला होता.
उद्धव ठाकरे यांनी संपत्तीबाबत मुंबई उच्च न्यायालयात प्रोबेट याचिका दाखल केली आहे, तर या याचिकेला जयदेव ठाकरे यांनी आव्हान दिले आहे. उद्धव यांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेनुसार बाळासाहेबांनी १३ डिसेंबर २०११ रोजी मृत्यूपत्र केले होते आणि त्याच दिवशी सही केली होती. त्या वेळी स्वत: उद्धव, वकिल अधिक शिरोडकर, अनिल परब, शशी प्रभू आणि रवींद्र म्हात्रे यांना एक्झिक्यूटर बनविण्यात आले होते.
मृत्यूपत्रात काय लिहिलय?
> माझा मुलगा उद्धव नेहमीच माझ्यासोबत होता.
> मी आजारी असताना त्याने मला शक्ती दिली.
> 'मातोश्री' उभारण्यात त्याचा मोठा वाटा होता.
> त्याने शांततेत आयुष्य जगावे, अशी माझी इच्छा आहे.
> मला खात्री आहे, उद्धव जबाबदारीने वागेल आणि ठाकरे कुटुंबीयांमध्ये सलोखा राखेल
> जयदेवबद्दलही मला आपुलकी आहे. पण काही वर्षांपूर्वी त्याने स्वत:हून 'मातोश्री' सोडली.
> जयदेवने आणि स्मिताने घटस्फोट घेतला आणि आता तो त्याच्या दुसर्या पत्नीसोबत दुसरीकडे राहत आहे. त्याचे आयुष्य भरकटले आहे.
> जयदेवच्या या सर्व गोष्टींमुळे मी दुखावलोय आणि त्याला माझ्या संपत्तीतला कोणताही भाग न देण्याचा निर्णय घेतला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.