शिवसेनेकडून अमित शहा यांना 'मातोश्री'चे निमंत्रण!

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना 'मातोश्री'वर येण्याचे निमंत्रण शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.आज शहा हे मुंबई दौऱ्यावर येत आहे. 

Updated: Sep 4, 2014, 07:46 AM IST
शिवसेनेकडून अमित शहा यांना 'मातोश्री'चे निमंत्रण! title=

मुंबई : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना 'मातोश्री'वर येण्याचे निमंत्रण शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.आज शहा हे मुंबई दौऱ्यावर येत आहे. 

अमित शहा यांचे मुंबईत भरगच्च कार्यक्रम आहेत. या कार्यक्रमात त्यांची मातोश्री भेट नव्हती. महायुतीत जागा वाटपाबाबत तिढा कायम आहे. शिवसेना-भाजप युती आधीपासून असल्याने मोदी सरकार आल्यानंतर भाजपच्या अपेक्षा वाढल्या. महाराष्ट्रात जास्त जागांवर दावा केल्याने पेच निर्माण झाला आहे. विधानसभेच्या जागावाटपावरून भाजपा आणि शिवसेनेत निर्माण झालेला तणाव, स्वबळाची सुरू असलेली भाषा या पार्श्‍वभूमीवर शहा मातोश्रीवर जातील की नाही, याची उत्सुकता आहे. 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना लालकृष्ण आडवाणींपासून राजनाथ सिंग, नरेंद्र मोदी आदी भाजपाचे सगळेच मोठे नेते त्यांना भेटायला गेलेत आणि त्यांचे आशीर्वादही घेतलेत. मात्र भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या भेटीबाबत काहीही नियोजन नसल्याचे भाजपकडून स्पष्ट करण्यात येत आहे. पोस्टर वॉरवरुन भाजपकडून सांगण्यात आले, आमची युती कायम आहे.

दरम्यान, शिवसेना जोपर्यंत जागा वाढवून देत नाही तोपर्यंत शहा यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊ नये, असा भाजपाच्या महाराष्ट्रातील नेत्यांना वाटते तर केंद्रातील सरकारला बहुमत असले तरी हे रालोआचे सरकार आहे हे विसरू नका, असे शिवसेनेने शहा यांच्याकडे स्पष्ट केल्याचे सांगितले जात आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.