मुंबई : मुंबईनजिक मीरारोड भागातील काशिमिरा इथं मंगळवारी रात्री उशीरा शिवसेनेच्या स्थानिक नेत्यावर गोळीबार करण्यात आलाय.
शिवसेनेच्या शाखा उपप्रमुख अनिल चव्हाण यांच्यावर काल रात्री साडे आठ वाजल्याच्या सुमारास दोन अज्ञात इसमांनी गोळीबार केलाय. त्यांच्यावर समोरून एकानंतर एक अशा तीन गोळ्या झाडण्यात आल्या.
यानंतर अनिल चौहान यांना गंभीर अवस्थेत केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याचं सांगण्यात येतंय.
चौहान यांच्यावर हा हल्ला कुणी आणि का केलाय याबाबत मात्र अद्याप खुलासा झालेला नाही. मात्र, या घटनेचं काही सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलंय.
या घटनेनंतर ठाणे आणि मुंबईत तणावपूर्ण वातावरण आहे. मुंबईत पुन्हा एका गुन्हेगारीचं प्रस्थ वाढल्याची ही चिन्ह नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी पुरेशी आहेत. या घटनेमुळे पोलिसांनाही जागं केलंय. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर एसपी आणि डेप्युटी एसपींनी या प्रकरणाच्या चौकशीची सूत्रं आपल्या हाती घेतलीत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.