मुंबई : मराठा मोर्चांबाबत सामनामध्ये छापून आलेल्या कार्टुनवरून शिवसेना आमदारांमध्येही नाराजी पसरलीय. खासगीत अनेक आमदार नाराजी व्यक्त करत असल्याची चर्चा आहे.
मतदारसंघांमधून आमदारांवर दबाव येत असल्यामुळं आमदार सामनाच्या भूमिकेवर नाराज असल्याचं समजतंय.
कार्टुनचा विषय चुकीचा पद्धतीनं हाताळला असून दिलगिरी व्यक्त करून विषय संपवायला हवा होता अशी भावना शिवसेना आमदारांमध्ये निर्माण झालीय. राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये शिवसेनेच्या काही पदाधिका-यांनी राजीनामा दिलाय.