मुंबई : निवडणूक जवळ येतेय, आणि प्रत्येक मतदार संघात पोश्टर मॅन झळकताय, हे प्रमाण सर्वच पक्षांमध्ये कमी अधिक प्रमाणात दिसून येतंय.मात्र मनसे आमदार नितिन सरदेसाई यांनी दादर-माहिम भागात ‘आपलं माणूस’ असे पोस्टर्स लावल्यानंतर, शिवसेनेने त्यांना टोला लगावला आहे. जनतेमध्ये कधीही न दिसणारे नेते फक्त पोस्टर्सवरच दिसतात. तसंच दादर माहिम भागातून शिवसेनाच विजयी होईल, अशी प्रतिक्रिया शिवसेना विभागप्रमुख सदा सरवणकर यांनी दिली आहे.
शिवसेनेने विरोधकांवर टीका केली असली, तरी शिवसेनेसह सर्वच पक्षात पोश्टर मॅन असल्याची चर्चा आहे.आचार संहिता लागू झाली आहे, तरीही राजकीय पोस्टर्स अजूनही झळकतांना दिसतायेत, यावर निवडणूक आयोग काही कारवाई करतंय का?, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकलं आणि माहिममध्ये मनसेची मोठमोठी होर्डिंग्स झळकत आहेत. माहिम आणि प्रभादेवी भागात मनसे नेते नितीन सरदेसाई यांचे पोस्टर लागले आहेत.
त्यामुळे राज ठाकरे विधानसभा निवडणुकीत उतरणार नाहीत, असा अंदाज बांधण्यात येत आहे. ‘आपलं माणूस’ या संदर्भातील देसाईंची होर्डिंग्ज माहिममध्ये लागली आहेत. दरम्यान आचारसंहिता लागू असतानाही अशी होर्डिंग्स झळकत आहेत. यावर निवडणूक आयोग काय कारवाई करतेय हे पाहावं लागेल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.