मुंबई : येत्या रविवारी शिवसेनेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित विशेष जाहीर सभेपासून भाजपला दूर ठेवण्यात येणार आहे.
गोरेगावमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सभेला भाजपच्या नेत्यांना निमंत्रण देण्यात आलेलं नाही.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेच प्रकाशझोतात राहवेत, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.