मुंबई : माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांचा जेलमधला मुक्काम पुन्हा वाढलाय. मुंबई उच्च न्यायालयानं त्यांचा जामीन अर्ज फेटाळलाय.
तीन महिन्यांच्या जेलमधील मुक्कामानंतरही भुजबळांना दिलासा मिळालेला नाही. प्रकृतीचं कारण देत भुजबळांनी जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र तीन डॉक्टरांच्या पॅनलनं भुजबळांची वैद्यकीय तपासणी करून त्यांची प्रकृती उत्तम असल्याचा अहवाल सादर केला होता.
मात्र भुजबळांनी या अहवालावर आक्षेप घेत प्रकृती ठिक नसल्याचा दावा केला होता. मात्र न्यायालयानं त्यांची अर्ज फेटाळल्यामुळं भुजबळांचा जेलमधला मुक्काम लांबलाय. बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी भुजबळ अटकेत आहेत.