'तर मुख्यमंत्र्यांनी बीएमसीतल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी'

मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार असेल तर नगरविकास खात्याचे प्रमुख असलेल्या मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी असं खुलं आव्हान शिवसेनेनं दिलंय.

Updated: Dec 29, 2016, 06:06 PM IST
'तर मुख्यमंत्र्यांनी बीएमसीतल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी' title=

मुंबई : मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार असेल तर नगरविकास खात्याचे प्रमुख असलेल्या मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी असं खुलं आव्हान शिवसेनेनं दिलंय. महापालिका आयुक्त हे नगरविकास खात्याच्या अखत्यारित येतात. मुख्यमंत्र्यांना काही घोळ वाटत असेल तर त्यांनी जरूर चौकशी करावी असं आव्हान शिवसेना आमदार अनिल परब यांनी दिलंय.

महापालिकेत स्थायी समितीचे निर्णय एकमताने होतात. जर या निर्णयांमध्ये पारदर्शकता नव्हती तर भाजपच्या सदस्यांनी किती वेळा विरोध केला असा सवालही परबांनी उपस्थित केलाय. निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला बदनाम करण्याच्या डाव असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप काल मुख्यमंत्र्यांनी एका कार्यक्रमात बोलताना केला होता.