मुंबई : मराठी चित्रपटांना 'प्राईम टाईम' दिल्याने ट्विटरवरून टीका करणाऱ्या प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांच्याविरोधात त्यांच्या घरासमोर आंदोलन केले. त्यांना दहीमिसळ आणि वडापाव भेट देण्याची शक्कल लढविली. यावेळी पोलिसांनी डे यांच्या घरासमोर कडक पाहारा ठेवला होता.
डे यांच्या घराबाहेर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. मल्टिप्लेक्समध्ये मराठी चित्रपट प्राईम टाईमला दाखवला जाणार असल्याने आता पॉपकॉर्नऐवजी दहीमिसळ आणि वडापाव देखील खावा लागणार, असे टीकात्मक ट्विट शोभा डे यांनी केले होते. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 'हुकूमशहा' असे संबोधले होते.
यावरुन शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी शोभा डे यांच्या विरोधात विधानसभेत हक्कभंगाची नोटीस दिली. मात्र, सभापतींनी शिवसेनेचा प्रस्ताव फेडाळला. तसेच शोभा डे यांनी माफी मागण्यास नकार दिला. यावर शिवसेनेचे कार्यकर्ते शोभा डे यांच्या घराबाहेर दहीमिसळ, वडापाव घेऊन दाखल झाले आणि डे यांचा निषेध नोंदवला.
दरम्यान, मुंबई पोलिसांनी बंदोबस्त वाढवल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात देखील घेतले. तसेच शोभा डे यांनी आपल्या ट्विटरवरून मुंबई पोलिसांचे आभार देखील मानले.
थॅंक्यू शिवसेना!
Thank you , Shiv Sena. Delicious! pic.twitter.com/efEy7vuQ5w
— Shobhaa De (@DeShobhaa) April 9, 2015
'डे' ना पोलीस संरक्षण
Well done, Mumbai Police. Thank you. pic.twitter.com/Zt6WJL2Zqy
— Shobhaa De (@DeShobhaa) April 9, 2015
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.