मुंबई: प्रत्येक वेळी काहीही झालं तरी तुमचे मंत्री कधी राजीनामा देणार? सत्ता कधी सोडणार असा प्रश्न आम्हाला विचारला जातो, जर आमची राष्ट्रभक्ती इतकीच खुपत असेल तर भाजपनं सत्ता सोडावी, या शब्दात भाजपवर पर्यायानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर संजय राऊत यांनी टीका केलीय.
आम्ही जे काही केलं ते राष्ट्रभक्तीसाठी केलं, ज्या पाकड्यांनी तुकाराम ओंबळेंसारख्या मुंबई पोलीसांचे बळी घेतले त्याच मुंबई पोलीसांना काल पाकड्यांची सुरक्षा करावी लागली ही पोलीसांसाठी मानहानी असल्याचं राऊत म्हणाले. जर भूमिका पटत नसेल तर शिवसेनेचे आमदार राजीनामा का देत नाहीत, या प्रश्नावर हा प्रश्न आम्हालाच का विचारला जातो, भाजपाला का विचारत नाही असा सवाल राऊतांनी विचारला.
आणखी वाचा - मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र कळलेलाच नाही : संजय राऊत
सत्ता दोघांची आहे आणि भाजपला जर जम्मू-काश्मिरमध्ये राष्ट्रद्रोही भूमिका घेणारे मुफ्ती मोहम्मद सईद चालतात तर राष्ट्रभक्तीची भूमिका घेणारी शिवसेना का नाही? असा सवाल संजय राऊतांनी विचारला आहे.
शाईफेक करणाऱ्यांचा सत्कार योग्यच
राष्ट्रद्रोही भूमिका घेणाऱ्यांवर शाईफेक करणाऱ्यांचा सन्मान योग्यच असल्याचं संजय राऊतांनी सांगितलं. आम्ही कायदा-सुव्यवस्थेचं उल्लंघन केलं नाही. उलट खुर्शीद कसुरींविरोधातील शिवसेनेच्या भूमिकेला भाजपचा पाठिंबा हवा होता, असंही खासदार राऊत म्हणाले.
संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत मांडलेले महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे:
- शिवसेना पाकिस्तानविरोधात एकाकी लढा देत आहे, हा गुन्हा आहे का?
- पाकड्यांच्या रक्षणासाठी पोलिसांचं संरक्षण देणं हा शहीदांचा अपमान आहे.
- ज्या पोलिसांनी पाकड्यांविरोधात लढा दिला, तेच पोलीस काल कसुरींच्या संरक्षणासाठी माना खाली घालून उभे होते, ही शरमेची आणि चिंताजनक बाब आहे.
शिवसेनेमुळं महाराष्ट्राची काय बदनामी झाली असा सवाल संजय राऊत यांनी फडणवीसांना विचारला आहे.
- पाकिस्तानविरोधात लढणाऱ्यांचा, शिवसैनिकांचा सत्कार करणं योग्यंच.
- दरवेळेस आमच्या नेत्यांच्या राजीनाम्याविषयी प्रश्न का उपस्थित केला जातो? आमचा प्रखर राष्ट्रवादी बाणा कोणाला टोचत असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा.
- पाकिस्तानविरोधात लढणारी प्रत्येक व्यक्ती ही जवानासमान असून शिवसैनिकही देशाचे जवानच आहेत.
- आम्ही काल जे केलं ते योग्यचं होता, कालच्या प्रसंगात सरकारने आमच्यासोबत असायला हवं होतं.
आणखी वाचा - सेनेच्या 'त्या' सहा पठ्ठ्यांना उद्धव ठाकरेंकडून शाब्बासकी!
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.