www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मी कोणतीही चूक केलेली नाही, त्यामुळे माफी मागायचा प्रश्नच नाही, मी ४५ वर्ष शिवसेनेची सेवा केलीय त्यामुळे शिवसेना सोडायचा प्रश्नच नाही असं मनोहर जोशी यांनी स्पष्ट केलंय.
दसरा मेळाव्यात झालेल्या प्रकारानंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी हे अज्ञातवासात गेले होते. सर कुठे आहेत याची कोणालाच कल्पना नव्हती. मात्र आता जोशी मुंबईत परतलेत. जोशी यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र या पत्रात काय आहे याचा तपशील उघड करण्यास त्यांनी नकार दिलाय.
माझ्या विरोधात कटकारस्थान केलं गेलं आहे. कटकारस्थान करणाऱ्यांवर मी नाराज आहे. मी ४५ वर्षे पक्षाची सेवा केली आहे. त्यामुळे नाराज होण्याच प्रश्नच येत नाही. मी शिवसेना सोडणार नाही. मी काही चूक केली नाही तर माफी मागणार नाही. आपले जे काही म्हणणे आहे ते, मी उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून दिले आहे, असे जोशी म्हणालेत.
शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर झाला. या मेळाव्याळा जोशी यांनी येऊ नका, असा निरोप देण्यात आला होता. मात्र, जोशी मेळाव्याला गेलेच. तेथे त्यांनी विरोध झाला. त्यानंतर तडक जोशी उद्धव ठाकरे यांनी भेट घेऊन व्यासपीठावरून खाली उतरले. याबाबत जोशी म्हणालेत, दसरा मेळाळ्यात झालेला प्रकार दुर्दैवी होता.
ठळक मुद्दे
- मी नाराज नाही.
- मी शिवसेना सोडणार नाही.
- मी काही चूक केली नाही तर माफी मागणार नाही.
- मी उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविले आहे.
- दसरा मेळाळ्यात झालेला प्रकार दुदैवी होता.
- एक तर पक्षात राहा नाहीतर नाराजी व्यक्त करा.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४
तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ