www.24taas.com, मुंबई
मुंबईत माहीमच्या नयानगर झोपडपट्टीला लागलेल्या भीषण आगीत ६ जणांचा मृत्यू झाला आहे. यात २ लहान मुलांचा समावेश आहे. रहेजा हॉस्पिटलसमोर असलेल्या या झोपडपट्टीला पहाटेच्या सुमारास आग लागली. दोन लहान मुलांसह काही जण जखमी झाले आहेत. त्यांना भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
नयानगर या झोपडपट्टीला पहाटेच्या वेळी भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. मात्र तेथील अनेक चिंचोळ्या अशा गल्ल्यांमुळे मदतकार्यत अनेक अडथळे येत होते.
या आगीत ६ जणांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. परिसरात अत्यंत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पहाटेच्या सुमारास लागली आग ही झपाट्याने पसरत गेल्याने काही कळायच्या आताच अनेकजण या आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. मात्र आगीचे कारण अद्यापही समजू शकलेले नाही.