राष्ट्रवादीच्या नवाब मलिकांचे डोके फिरले - मुनगंटीवार

देशाचे ज्यांनी उपपंतप्रधान पद भूषविले आहे. त्या नेत्यांवर असे आरोप करणारे चुकीचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचे डोके फिरले आहे. म्हणून ते असे बोलत आहेत, अशी खरमरीत प्रतिक्रिया भाजपचे प्रदेश अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी दिलीय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jan 24, 2013, 06:57 PM IST

www.24taas.com,मुंबई
देशाचे ज्यांनी उपपंतप्रधान पद भूषविले आहे. त्या नेत्यांवर असे आरोप करणारे चुकीचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचे डोके फिरले आहे. म्हणून ते असे बोलत आहेत, अशी खरमरीत प्रतिक्रिया भाजपचे प्रदेश अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी दिलीय.
तालिबानी समर्थक नेत्यांसोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संबंध आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला होता. याप्रकरणी भाजपनं स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, लालकृष्ण अडवाणी हे ज्येष्ठ नेते आहेत. ते देशाचे उपपंतप्रधान होते. त्यामुळे असे आरोप होणे चुकीचे आहे, असे मुनगंटीवार म्हणालेत.
नवाब मलिक यांच्या आरोपांबद्दल सुधीर मुनगंटीवार यांनी एका राष्ट्रीय पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांवर असे आरोप करणाऱ्या व्यक्तींच्या बुद्धिमत्तेवरच प्रश्नचिन्ह उभं केलं आहे.

तालिबानी समर्थक नेते मौलाना फैजूल रेहमान यांच्यासोबत २००५ साली लालकृष्ण अडवाणी, रा स्व संघ आणि विहिप नेत्यांची दिल्लीच्या कार्यालयात गुप्त बैठक झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या बैठकीत काय झालं, ते उघड करावं, अशी मागणीही त्यांनी होती.
काही दिवसांपूर्वीच केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला होता. यावर त्यांची भाजप आणि इतर हिंदुत्ववादी पक्षांनी निंदाही केली होती.