तोंडावर पडल्यानंतरही स्कायमेटचा पुन्हा पावसाचा अंदाज

स्कायमेट या खासगी संस्थेने पावसाबाबत अंदाज वर्तवला आहे. या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल, असा अंदाज स्कायमेटचा आहे. स्कायमेटने मागच्या वर्षी चांगला पाऊस होईल असा अंदाज वर्तवला होता. मात्र मागील वर्षी स्कायमेट सपशेल तोंडावर पडले होते, आणि दुष्काळाचा सामना करावा लागला.

Updated: Apr 11, 2016, 09:55 PM IST
तोंडावर पडल्यानंतरही स्कायमेटचा पुन्हा पावसाचा अंदाज title=

मुंबई : स्कायमेट या खासगी संस्थेने पावसाबाबत अंदाज वर्तवला आहे. या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल, असा अंदाज स्कायमेटचा आहे. स्कायमेटने मागच्या वर्षी चांगला पाऊस होईल असा अंदाज वर्तवला होता. मात्र मागील वर्षी स्कायमेट सपशेल तोंडावर पडले होते, आणि दुष्काळाचा सामना करावा लागला.

भारतीय हवामान खात्याचा अंदाज जवळ-जवळ
मात्र त्याच वेळी भारतीय हवामान खात्याने सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवला होता. स्कायमेट आणि हवामान खात्याचे अंदाज परस्पर विरोधी वाटत होते. अखेर हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला.

स्कायमेटचं सावध पाऊल
स्कायमेटने मागील वर्षाचा अनुभव लक्षात घेऊन या वर्षी घाई न करता, सावध पाऊल टाकलं आहे. हवामान खात्याने सरासरीपेक्षा चांगला पाऊस होईल, असा पहिला अंदाज वर्तवल्यानंतर,  स्कायमेटनेही सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे.

स्कायमेटची टक्केवारी
स्कायमेटच्या अंदाजानुसार, जून महिन्यात सरासरीच्या ९० टक्के, जुलै महिन्यात १०५ टक्के, ऑगस्ट महिन्यात १०८ टक्के, तर सप्टेंबरमध्ये सरासरीच्या ११५ टक्के पाऊस पडणार आहे. एकूण सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचं स्कायमेटनं म्हटलं आहे. स्कायमेटचा पिक विमा कंपन्यांसाठी पर्जन्यमापनात सहभाग दिसतो.