स्म़ती इराणींमुळे शास्त्रज्ञ अनिल काकोडकरांचा राजीनामा

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्याशी मतभेद झाल्याने मराठी ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांनी मुंबई आयआयटीच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. 

Updated: Mar 18, 2015, 02:34 PM IST
स्म़ती इराणींमुळे शास्त्रज्ञ अनिल काकोडकरांचा राजीनामा title=

मुंबई : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्याशी मतभेद झाल्याने मराठी ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांनी मुंबई आयआयटीच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. 

आयआयटीच्या संचालकपदाच्या नियुक्तीवरुन काकोडकर आणि स्मृती इराणी यांच्यात मतभेद झाले होते. यामुळेच त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे.

आयआयटी पाटणा, भुवनेश्वर आणि रोपड या तीन केंद्रांच्या संचालकपदाच्या निवडीवरुन अनिल काकोडकर आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास खात्याच्या मंत्री  स्मृती इराणी यांच्यात मतभेद झाले होते. 

या संचालकपदाच्या निवड करणाऱ्या सर्च अँड सिलेक्शन कमिटीमध्ये इराणी, काकोडकर हे सदस्य आहे. या समितीची बैठक २२ मार्च रोजी होणार असून या पदासाठी एकूण ३७ उमेदवारांची मुलाखती घेतल्या जाणार आहेत. या निवड प्रक्रियेवरुन काकोडकर आणि इराणी यांच्यात मतभेद झाले होते.

मी राजीनामा दिलाय. कारण मला पुढे जायचे आहे, असे काकोडकर यांनी स्पष्ट केले आहे. स्मृती इराणींशी मतभेद झाले होते का, या प्रश्नावर त्यांनी बोलणे टाळले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.