नवी मुंबई : गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा अभिनव उपक्रम नवी मुंबईत पार पडला. खारघर येथील डॉ. जी. डी. पोळ फाऊंडेशनच्या शैक्षणिक संकुलात नवी मुंबई परिसरातल्या अनाथालयातील मुलांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. हेल्थ चेकअप, खेळ आणि स्नेहभोजन याचं आयोजन यावेळी करण्यात आलं होतं.
या शिबिरात सहा अनाथालयांमधील दीडशेहून अधिक मुले सहभागी झाली होती. या मुलांना खेळण्यासाठी विविध खेळणीही ठेवण्यात आली होती. गणेशोत्सव म्हणजे फक्त डीजेचा दणदणाट नव्हे तर सामाजिक बांधिलकी जपण्याचा एक मार्गही आहे हे या स्नेहमेळाव्यातून दाखवून देण्यात आलं.