उमेदवाराला सोशल नेटवर्किंगचाही खर्च द्यावा लागणार

येत्या लोकसभा निवडणुकांमध्ये उमेदवारी करणाऱ्या उमेदवारांना आता सोशल नेटवर्किंगवर केलेल्या खर्चाचीही माहिती द्यावी लागणार आहे.

Updated: Feb 13, 2014, 08:39 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
येत्या लोकसभा निवडणुकांमध्ये उमेदवारी करणाऱ्या उमेदवारांना आता सोशल नेटवर्किंगवर केलेल्या खर्चाचीही माहिती द्यावी लागणार आहे.
निवडणूक आयोगाने या आधी वृत्तपत्र, टीव्ही यावरील खर्चासह सोशल मीडियावर होणाऱ्या खर्चावरही लक्ष केंद्रीत केलं आहे. यानुसार सोशल नेटवर्किंगवर होणारा खर्चही उमेदवाराला देणे बंधनकारक असणार आहे, उत्तर प्रदेशच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी ही माहिती दिली आहे.
यात सोशल नेटवर्किंग साईटस, ब्लॉग आणि इतर वेबसाईटचा समावेश आहे. हा समावेश पहिल्यांदाच करण्यात आला आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.