एसटीची 31 जुलैपासून भाडेवाढ

एसटीच्या प्रवासभाड्यात 31 जुलैपासून सरासरी 0.81 टक्‍क्‍यांची वाढ होणार आहे. 

Updated: Jul 27, 2014, 08:52 PM IST
एसटीची 31 जुलैपासून भाडेवाढ title=

मुंबई : एसटीच्या प्रवासभाड्यात 31 जुलैपासून सरासरी 0.81 टक्‍क्‍यांची वाढ होणार आहे. 

आता साध्या किंवा जलद आणि रात्रसेवेमध्ये प्रति 6 किलोमीटरसाठी 5 पैसे, तर निमआराम सेवेसाठी प्रति 6 किलोमीटरसाठी 10 पैशांची वाढ होणार आहे. 

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळासाठी, राज्य शासनाने मंजूर केलेल्या आपोआप भाडेवाढ योजनेअंतर्गत ही वाढ होतेय. म्हणजे डिझेलची भाववाढ झाली की, त्यानंतर एसटीचीही भाडेवाढ होणार.

डिझेलच्या दरवाढीमुळे महामंडळाने हा निर्णय घेतल्याचे महामंडळाने दिलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. 

साध्या किंवा जलद सेवेच्या 31 ते 150 किलोमीटर प्रवासासाठी एक रुपया वाढ करण्यात आली आहे, तर शहरी सेवेच्या पहिल्या 16 किलोमीटरपर्यंतच 1 रुपया वाढ करण्यात आली आहे, त्यापुढील प्रवासासाठी कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.