मुंबई : मुंबईच्या बोरीवलीत एक खळबळजनक घटना घडलीय. बांधकाम सुरु असलेल्या एका इमारतीच्या बेसमेंटचा साचाच जमिनीच्यावर आलाय. हा धक्कादायक प्रकार घडलाय तो चिकूवाडी येथे ही घटना घडली.
या अजब प्रकारामुळे स्थानिक रहिवाशांना काय घडतय हे कळेचना, बघ्यांचीही गर्दी वाढल्यानं पोलीस आणि अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेतलीय. तपासाअंती पावसामुळे बांधकाम सुरु असलेल्या इमारतीचं बेसमेंटवर १५ ते १७ फूट आलंय.
जमीन खोदून खांब न उभारता राफ्ट पद्धतीनं बांधकाम करत असल्यानं हा प्रकार घडल्याचं समोर आला आहे. पालिका अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि विकासकाला तांत्रिक अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.