स्टेट बॅंकेचे होम, कार, शिक्षण कर्ज आणखी स्वस्त

स्टेट बँकेने सर्वसामान्यांसाठी गुजन्यूज दिलेय. बॅंकेचे होम, कार, शिक्षण कर्ज आणखी स्वस्त झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळालाय.

Updated: May 3, 2016, 08:48 AM IST
स्टेट बॅंकेचे होम, कार, शिक्षण कर्ज आणखी स्वस्त title=

मुंबई : स्टेट बँकेने सर्वसामान्यांसाठी गुजन्यूज दिलेय. बॅंकेचे होम, कार, शिक्षण कर्ज आणखी स्वस्त झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळालाय.

घर, गाडी, कार, शिक्षण, सोने कर्ज व्याजदर कमी केले आहेत. गृहकर्जावर आता ९.४५ टक्क्यांऐवजी ९.४० टक्के, महिलांसाठी ९.४० ऐवजी ९.३५ तर वाहनकर्जाच्या दरातही ०.०५ टक्का कपात केली आहे. 

तर वाहन कर्ज ९.७५ टक्के व्याजाने मिळेल. शैक्षणिक कर्जाच्या व्याजदरातही ०.०५ टक्का कपात करण्यात आली आहे. मात्र, ७.५० लाख रुपयांपेक्षा अधिक कर्जावर १०.८५ टक्के व्याज द्यावे लागणार आहे.