मुंबईः चालू आर्थिक वर्षात स्टेट बँक ऑफ इंडिया तब्बल पाच हजार एटीएम सुरू करणार आहे. डेबिट कार्डमागे एटीएम व्यवहारांचं प्रमाण वाढवण्यासाठी बँकेनं हा निर्णय घेतला आहे. एटीएम मशिन्सची उपलब्धता ही समस्या असून मशिन्स जसजसे मिळतील तशी एटीएमची संख्या वाढवली जाईल, असं बँकेचे एमडी कृष्णकुमार यांनी सांगितलंय.
गेल्या आर्थिक वर्षाअखेरीस बँकेची देशभर ४३,५१५ एटीएम आहेत. एटीएमचं सर्वाधिक नेटवर्क असूनही स्टेट बँकेला अन्य बँकांची एटीएम वापरल्याबद्दल ९९१ कोटी रुपये द्यावे लागले. बँक ग्राहकानं खातं नसलेल्या बँकेच्या एटीएमचा वापर केल्यास ग्राहकाच्या बँकेला अन्य बँकेला फी द्यावी लागते.
एटीएममधून पैसे काढल्यानंतर लागणाऱ्या फीबाबत कुमार म्हणाले, इंडियन बँक असोसिएशननं भारतीय रिझर्व्ह बँकेला पत्र लिहिलंय. यात महानगर आणि इतर शहरांमधील भागांमध्ये प्रत्येक वापरामागे फी लावण्याची मागणी केलीय. विशेष म्हणजे एसबीआयच्या चेअरमन अरुंधती भट्टाचार्य यांनी पहिल्यांदा एटीएम वापरावर फी लावण्याचं समर्थन केलं होतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.