सुप्रीया सुळेंनी घेतली सेनेच्या `पीडित महिले`ची भेट

शिवसेना आमदार विनोद घोसाळकर यांनी मानसिक छळ केल्याचा आरोप करणाऱ्या शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रे यांची सर्वच पक्षांचे नेते भेटी-गाठी घेत आहेत.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jan 24, 2014, 08:22 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
शिवसेना आमदार विनोद घोसाळकर यांनी मानसिक छळ केल्याचा आरोप करणाऱ्या शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रे यांची सर्वच पक्षांचे नेते भेटी-गाठी घेत आहेत.
राष्टवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनीही म्हात्रे यांची भेट घेतली. या वेळी शिवसेना नगरसेविका आणि माजी महापौर शुभा राउळही उपस्थित होत्या. शीतल म्हात्रे यांना सर्वच स्तरातून पाठिंबा मिळत आहे. एका महिलेनं एका पीडित महिलेची घेतलेली ही भेट असल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.
दरम्यान, शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रे प्रकरणावरून मुंबई महापालिका सभागृहात आज पुन्हा एकदा जोरदार गोंधळ उडाला. शिवसेनेमध्ये महिला नगरसेविकांना अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याबद्दल मनसेसह अन्य विरोधी पक्षांनी चर्चेची मागणी केली. परंतु विरोधकांची ही मागणी महापौर सुनील प्रभू यांनी फेटाळल्यानं गोंधळाला सुरूवात झाली.
त्यातच मनसे गटनेते संदीप देशपांडे यांनी महापौरांसमोरील कागदपत्रे खेचल्यामुळे गोंधळात आणखी भर पडली. शिवसेनेचे नगरसेवक देशपांडेंच्या अंगावर धावून गेल्यानं स्थिती आणखी चिघळली. शिवसेना नगरसेवक आणि विरोधक यांच्यात यावेळी जोरदार घोषणाबाजीही रंगली. दोन्ही बाजूने नगरसेवक हमरातुमरीवर आल्यानं गोंधळ आणखीच वाढला.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.