बोगस १६२ चिटफंड कंपन्यांवर कारवाई करा : सोमय्या

सेबीनं राज्यातल्या १६२ चीट फंड कंपन्या बोगस असल्याचं जाहीर केलंय. त्यामध्ये समृद्ध जीवन फुड्स इंडिया लिमिटेड, साई प्रसाद फुड्स लिमिटेड, साई प्रसाद प्रॉपर्टीज लिमिटेड, केबीसी मल्टीट्रेड प्रायव्हेड लिमिटेड, केबीसी क्लब्ज अँड रिसॉर्ट प्रायव्हेट लिमिटेड, अकोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, सहारा गोल्ड मार्ट लिमिटेड अशा काही प्रमुख कंपन्यांचा त्यात समावेश आहे. 

Updated: Jun 9, 2015, 08:51 PM IST
बोगस १६२ चिटफंड कंपन्यांवर कारवाई करा : सोमय्या title=

अमित जोशी, झी मीडिया, मुंबई: सेबीनं राज्यातल्या १६२ चीट फंड कंपन्या बोगस असल्याचं जाहीर केलंय. त्यामध्ये समृद्ध जीवन फुड्स इंडिया लिमिटेड, साई प्रसाद फुड्स लिमिटेड, साई प्रसाद प्रॉपर्टीज लिमिटेड, केबीसी मल्टीट्रेड प्रायव्हेड लिमिटेड, केबीसी क्लब्ज अँड रिसॉर्ट प्रायव्हेट लिमिटेड, अकोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, सहारा गोल्ड मार्ट लिमिटेड अशा काही प्रमुख कंपन्यांचा त्यात समावेश आहे. 

या कंपन्यांवर कारवाई करावी, अशी मागणी भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं केलीय. या चीट फंड कंपन्यांनी जनतेचे ४० हजार कोटी रूपये लुटले असल्याची टीका सोमय्या यांनी केलीय.

गरवारे क्लब हाऊस, सायट्रस हॉटेल्स,ऑरेंज हॉलिडेज, एनमार्ट रिटेल्स गुरुप्रसाद, व्हर्जिन गोल्ड इंटरनॅशनल, मीरा रिअलटर्स या चिटफंड कंपन्या संशयाच्या फेऱ्यात आहेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.