www.24taas.com, मुंबई
‘भाडेवाढ लागू करा अन्यथा रविवारपासून टॅक्सी बंद’चा इशारा रिक्षा-टॅक्सी संघटनांनी दिलाय.
रिक्षाच्या भाड्यात दोन रुपये तर टॅक्सीच्या भाड्यात एका रुपयानं वाढ करण्यात आली आहे. ही भाडेवाढ मात्र अजूनही लागू करण्यात आलेली नाही. त्यामुळं ही भाडेवाढ तातडीनं लागू करण्यासंबंधी निर्णय घेण्यासाठी परिवहन प्राधिकरणाची बैठक तातडीनं बोलवावी, अशी मागणी करण्यात येतेय. रविवारपर्यंत भाडेवाढीच्या निर्णयाची अंमलबजावणी न केल्यास टॅक्सी बंद करण्याचा इशारा रिक्षा-टॅक्सी संघटनेचे ए. एल. क्वॉड्रोस यांनी दिलाय.
हकिम समितीच्या शिफारशी स्वीकारा अशी मागणीही या संघटनेनं केलीय. शरद रावप्रणित संघटनेना मात्र या आंदोलनात सहभागी होणार नसल्याची माहिती मिळतेय.