मुंबई : काँग्रेस नेत्याने कामाच्या बहाण्याने मॉरिशसला नेऊन बलात्कार केल्याची तक्रार एका तरुणीने वांद्रे कोर्टात केली. त्याच्या विरोधात तक्रार करण्यात आली. पीडित मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी शिवानंद हुल्यालकर याला शुक्रवारी रात्री अटक केली.
पीडित मुलगी मुंबईत हुल्यालकरसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होती. तिने हॉटेलमधली नोकरी सोडून त्याच्या ऑफिसमध्ये काम सुरू केले. २० जूनला कामाच्या निमित्ताने त्याने तिला मॉरिशसला नेले आणि तिथे तिच्यावर बलात्कार केला. तिच्या शारिरिक छळही केला. शिवाय तिला मारण्याची धमकीही दिली.
पीडित तरुणीने तिथून कसाबसा पळ काढला आणि मुंबई गाठली. त्यानंतर तिने हुल्यालकर विरोधात वांद्रे पोलिसांत तक्रार दाखल केली. हुल्यालकरने पीडित मुलीला दागदागिने, फ्लॅट आणि कॅशही दिल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पण मुलीने या सर्व बाबींचा इन्कार केला आहे.