'जगातला सर्वाधिक धोकादायक मुंबई लोकल प्रवास'

मुंबईचा लोकल प्रवास हा जगातला सर्वाधिक धोकादायक प्रवास बनलाय. हे मत व्यक्त केलंय मुंबई उच्च न्यायालयानं.

Updated: Jan 22, 2016, 11:32 PM IST
'जगातला सर्वाधिक धोकादायक मुंबई लोकल प्रवास'  title=

मुंबई : मुंबईचा लोकल प्रवास हा जगातला सर्वाधिक धोकादायक प्रवास बनलाय. हे मत व्यक्त केलंय मुंबई उच्च न्यायालयानं.

मुंबईच्या लोकल ट्रेनमधील अपघातात दरवर्षी ३ ते ४ हजार लोकांना आपले प्राण गमवावे लागतात. इतके बळी जगातल्या कुठल्याही देशातल्या कुठल्याही रेल्वे लाईनवर जात नाहीत, असं निरीक्षण कोर्टानं नोंदवलंय. 

मुंबई रेल्वे प्रवासात ज्येष्ठ नागरिकांना भेडसावणा-या समस्यांबाबत ए बी ठक्कर यांनी हायकोर्टाला एक पत्र लिहीलं होतं. त्याची सुमोटो याचिकेद्वारे कोर्टानं दखल घेतली. यावरच्या सुनावणीवेळी जस्टीस नरेश पाटील यांनी रेल्वेसह राज्य सरकार, पालिका प्रशासन आणि संबंधित यंत्रणांना धारेवर धरलं. 

दरम्यान मुंबई उपनगरी प्रवासा संदर्भातल्या समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत. यासाठी जागतीक बँकेकडून निधी आणणार असल्याचं रेल्वेमंत्र्यांनी मुंबईत स्पष्ट केलं. दरम्यान मुंबईत कार्यालयीन वेळा बदलण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा सुरू अशल्याचं सुरेश प्रभू म्हणाले.