मुंबई : थर्टी फस्ट सेलिब्रेशन पार्ट्यांमध्ये खाण्या-पिण्याचे पदार्थ एमआरपीपेक्षा जास्त किंमतीनं विकता येणार नाहीत. असा प्रयत्न करणा-यांना कारवाईला सामोरं जावं लागणार आहे.
यासाठी वैधमापन विभागाची पथकं व्हिडीओ कॅमे-यांसह तयार करण्यात आलीयत. ही भरारी पथकं पार्ट्यांमध्ये सहभागी होऊन खाद्य पदार्थांच्या विक्रीच्या किमतीवर नजर ठेवणार आहेत.
थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनसाठी मुंबईत मोठ्या प्रमाणात पार्ट्यांचं आयोजन केलं जातं. त्यासाठी हजारो रुपये प्रवेश फी घेतली जाते शिवाय आतमध्ये खाण्या पिण्याच्या वस्तू प्रचंड किमतीनं विकल्या जातात. त्यावर यावर्षीपासून अंकुश ठेवला जाणार आहे.