www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
‘राज्य सरकारनं महाराष्ट्र टोलमुक्त करावा अन्यथा सत्तेत आल्यावर आम्हीच महाराष्ट्राला टोलमुक्त करू’ असं आश्वासनंच महायुतीच्या नेत्यांनी आज बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दिलं.
सेना, भाजप, आरपीआय आठवले गट आणि राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यामध्ये महत्वपूर्ण बैठक आज मुंबईत पार पडली. राज्यसभेची निवडणूक आणि लोकसभेच्या जागावाटपाच्या मुद्द्याच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी ही बैठक रंगशारदा इथं आयोजित करण्यात आली होती. यावेळी, लोकसभेच्या जागावाटपाच्या चर्चेसाठी महायुतीनं पाच सदस्यांची बैठक नेमलीय. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जागा वाटपाचा अंतिम निर्णय कमिटी घेणार असल्याचं सांगण्यात आलंय.
यावेळी, महायुतीनं महाराष्ट्राला टोलमुक्त करण्याचा निर्धारच व्यक्त केलाय. शिवाय, वीज दर ५० टक्क्यांवर आणण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.
दरम्यान, याच मुद्द्यांवर महायुतीनं २५ फेब्रुवारीला मुंबईत महामोर्चा तसंच ३० जानेवारीला इचलकरंजीमध्ये महामेळावा आयोजित केलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.