प्रवास सवलत : सरकारी कर्मचारी कुटुंबासाठी खूशखबर

राज्य सरकारने सरकारी कर्मचार्‍यांना एक खूशखबर दिलेय. सरकारी कर्मचार्‍यांच्या मिळणार्‍या प्रवास सवलतीत पती-पत्नी आणि मुलांबरोबरच आता आईवडील आणि अन्य अवलंबून असलेल्या नातेवाईकांचाही समावेश करण्यात आला आहे. यामुळे कौटुंबिक पिकनिकवर जाण्याचा आनंद या कर्मचार्‍यांना घेता येणार आहे.

Updated: Jun 4, 2015, 12:17 PM IST
प्रवास सवलत : सरकारी कर्मचारी कुटुंबासाठी खूशखबर title=

मुंबई : राज्य सरकारने सरकारी कर्मचार्‍यांना एक खूशखबर दिलेय. सरकारी कर्मचार्‍यांच्या मिळणार्‍या प्रवास सवलतीत पती-पत्नी आणि मुलांबरोबरच आता आईवडील आणि अन्य अवलंबून असलेल्या नातेवाईकांचाही समावेश करण्यात आला आहे. यामुळे कौटुंबिक पिकनिकवर जाण्याचा आनंद या कर्मचार्‍यांना घेता येणार आहे.

शासकीय अधिकारी, कर्मचार्‍यांना लागू असलेल्या महाराष्ट्र दर्शन आणि स्वग्राम प्रवास सवलतीमध्ये सुधारणा करत कुटुंबाच्या व्याख्येत बदल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला. 

महाराष्ट्र दर्शन रजा प्रवास सवलत योजनेमध्ये कुटुंबाच्या व्याख्येनुसार केवळ पती, पत्नी आणि दोन अपत्ये यांचाच समावेश होता. आता कुटुंबाच्या या व्याख्येत सुधारणा करून पती किंवा पत्नी व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या दोन अपत्यांव्यतिरिक्त अन्य अवलंबून असलेल्या नातेवाईकांचा समावेश करण्यात आला आहे.

या नातेवाईकांमध्ये पुरुष कर्मचार्‍यांच्या बाबतीत आईवडील तसेच त्यांच्यावर अवलंबून असलेले अविवाहित अज्ञान भाऊ-बहीण यांचा समावेश केला आहे. महत्त्वाचे म्हणजे, विधवा महिला अधिकारी, कर्मचारी यांच्याबाबतीत सासू-सासरे यांचाही समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

तसेच अविवाहित शासकीय अधिकारी, कर्मचार्‍यांच्या बाबतीत आईवडील तसेच त्यांच्यावर अवलंबून असलेल्या भाऊ किंवा बहीण यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.