राधे माँ ने उघड केले लाल मिनी स्कर्टचं गुपीत

 स्वयंघोषित देवी असलेल्या 'राधे माँ' सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असलेल्या लाल रंगाच्या मिनी स्कर्ट आणि ड्रेस बद्दल गुपीत उघड केले आहे. 'राधे माँ'वर हुंड्यासाठी छळ करण्याचा आरोप लावण्यात आल्याने ती चर्चेत आली आहे. 

Updated: Aug 13, 2015, 01:59 PM IST
 राधे माँ ने उघड केले लाल मिनी स्कर्टचं गुपीत title=

मुंबई :  स्वयंघोषित देवी असलेल्या 'राधे माँ' सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असलेल्या लाल रंगाच्या मिनी स्कर्ट आणि ड्रेस बद्दल गुपीत उघड केले आहे. 'राधे माँ'वर हुंड्यासाठी छळ करण्याचा आरोप लावण्यात आल्याने ती चर्चेत आली आहे. 

'टाइम्स ऑफ इंडिया' ला दिलेल्या मुलाखतीत राधे माँ म्हणाली, मी माझ्या अत्यंत जवळच्या भविकांच्या कुटुंबासोबत एका ट्रीपला गेली होती. त्यांनी मला तो मिनी स्कर्ट आणि टॉप दिला होता.  त्यांची इच्छा होती की मी हा ड्रेस परिधान करावा. त्या ड्रेसमध्ये काही चुकीचं नाही किंवा अश्लिल नाही. तुम्हांला कोणी सांगितलं की साधू आणि साध्वींनी एका ठराविक ड्रेसमध्ये राहावे?  मी माझ्या भक्तांचं ऐकते, ते आनंदी असतील तर मीही आनंदी असते, असे राधे माँने सांगितले. 

राधे माँ हिने स्वतः उत्तरं न देता संजीव गुप्ताच्या माध्यमातून वृत्तपत्राला उत्तर दिलीत.  ती ध्यानसाधनेत डुंबली होती. तिच्या भक्तांनी तिला जसे कपडे दिले तसे ती परिधान करते. ते मला ड्रेस परिधान करतात आणि माझा मेकअप पण करतात, असेही राधे माँ ने सांगितले. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.